भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३३२ :
अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण :
कलम : ३३२ (क) (अ)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३३२ (ख) (ब)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३३२ (ग) (क)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या घरात अतिक्रमण झाले त्याचा कब्जा जिच्याकडे असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध : तो चोरीचा अपराध असल्यास.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या घरात अतिक्रमण झाले त्याचा कब्जा जिच्याकडे असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी असा कोणताही अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण करील,-
(a) क) (अ) जो मृत्यूच्या शिक्षेस पात्र असेल त्याला आजन्म कारावासाची, किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
(b) ख) (ब) जो आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल त्याला जास्तीत जास्त दहा वर्षे इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
(c) ग) (क) जो कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल :
परंतु जो अपराध करण्याचा त्याचा उद्देश असेल, तो अपराध म्हणजे चोरी असेल तर, कारावासाची मुदत सात वर्षेपर्यंत वाढवता येईल.