Bns 2023 कलम २७६ : औषधी द्रव्यांमध्ये भेसळ:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७६ :
औषधी द्रव्यांमध्ये भेसळ:
कलम : २७६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विक्रीसाठी ठेवायच्या कोणत्याही औषधीद्रव्यात किंवा औषधीय सिद्धपदार्थात, त्याची गुणकारिता कमी होईल किंवा कार्य बदलेल किंवा ते अपायकारक होईल अशा प्रकारे त्यात भेसळ करणे.
शिक्षा : एक वर्षाचा, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जर कोणी कोणतेही औषधी द्रव्य किंवा औषधीय सिध्दपदार्थ याची गुणकरिता कमी होईल किंवा त्याचे कार्य बदलेल, अपायकारक करील अशा रीतीने अशा औषधिद्रव्यात किंवा औषधीय सिद्धपदार्थात भेसळ केली आणि त्यात जणू काही अशी भेसळ झालेली नसावी त्याप्रमाणे कोणत्याही औषधोपचाराच्या प्रयोजनासाठी (उपयोगाकरिता) तो विकला जावा किंवा वापरला जावा असा त्याचा उद्देश असेल अथवा त्यासाठी तो विकला जाणे किंवा वापरला जाणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तर त्याला एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply