महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४९-अ :
१.(पोलिसांच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल शिक्षा :
जर पोलीस दलातील नसणारी कोणतीही व्यक्ती, या बाबतीत २.(३.(महाराष्ट्र) राज्यामधील) कोणत्याही क्षेत्रासाठी राज्यशासनाने सामान्य किंवा विशेष आदेशान्वये प्राधिकृत केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय पोलीस दलाचा गणवेश किंवा उक्त गणवेशाप्रमाणे दिसेल असा कोणताही पोषाख घालील, तर तिला अपराधसिद्धीनंतर ४.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
———
१. सन १९५५ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. मुंबई विधी अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९५६ या अन्वये राज्यामधील या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. महाराष्ट्र विधी अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० या अन्वये मुंबई राज्यामधील या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३८ अन्वये दोनशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
