भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २५० :
अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी देणगी घेणे इत्यादी :
कलम : २५० (क) (अ)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी देणगी देणे, इत्यादी अपराध देहांतदंड्य असल्यास.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : २५० (ख) (ब)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आजीवन कारावासाच्या किंवा १० वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : २५० (ग) (क)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : १० वर्षाहून कमी कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास.
शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
अपराध घडल्याचे आपण लपवून ठेवू ,किंवा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अपराधाबद्दलच्या वैध (कायदेशीर) शिक्षेपासून आपण वाचवू किंवा तिला कायदेशीर शिक्षा घडवण्यासाठी तिच्या विरुध्द करावयाची कार्यवाही आपण करणार नाही या प्रतिफलादाखल (याकरता) जो कोणी स्वत:करिता किंवा इतर कोणाकरिता कोणत्याही स्वरुपाची लाच (ग्रॅटीफिकेशन), परितोषण स्वीकारील अगर मिळविण्याचा (घेण्याचा) प्रयत्न करील किंवा स्वीकारण्याचे कबूल करील, अथवा स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला कोणतीही मालमत्ता परत मिळवून घेईल त्याला,-
(a) क) (अ) जर अपराध मृत्यूच्या शिक्षेस पात्र असेल तर सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल ;
(b) ख) (ब) जर अपराध आजन्म कारावासाच्या किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर त्याला , तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल ;
(c) ग) (क) जर अपराध दहा वर्षेपर्यंत नसलेल्या इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर, या अपराधासाठी उपबंधित केलेल्या (दर्शविलेल्या) सर्वाधिक मुदतीच्या कारावासाच्या एक चतुर्थांशापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.