Bp act कलम ४३ : जिल्हा दंडाधिकाऱ्याने जत्रा वगैरेच्या ठिकाणी उपाययोजना करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४३ :
जिल्हा दंडाधिकाऱ्याने जत्रा वगैरेच्या ठिकाणी उपाययोजना करणे:
१) जेव्हा जेव्हा आयुक्तास किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यास असे दिसून येईल की, आपल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी यात्रेमुळ, जत्रेमुळे किंवा तशा दुसऱ्या प्रसंगामुळे मोठा जनसमुदाय जमला असून किंवा जमण्याचा संभव असून या ठिकाणी कोणतीही रोगाची साथ उद्भवली आहे किंवा उद्भवण्याचा संभव आहे, तेव्हा तेव्हा ती साथ उद्भवू नये किंवा तिचा ैलाव होऊ नये म्हणून त्यास आवश्यक वाटेल अशी विशेष उपाययोजना करण्याचा आणि उक्त ठिकाणच्या रहिवाशांनी आणि हजर असलेल्या किंवा त्या ठिकाणी जात असलेल्या किंवा तेथून परत जात असलेल्या व्यक्तींनी पाळावयाचे असे विनियम जाहीर नोटिशीद्वारे त्यास ठरविण्यात येतील.
२) जिल्हा दंडाधिकाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्याने किंवा आयुक्ताच्या किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या मागणीवरुन मुख्य इलाखा शहर दंडाधिकाऱ्याने जमावाच्या जागी व जवळपास आरोग्यरक्षणाची व सुव्यवस्था राखण्याची व्यवस्था करण्यासाठी लागेल त्या खर्चाची तरतूद करता येईल अशी वाजवी फी पोट-कलम (१) खाली येणाऱ्या व्यक्तींवर बसवणे व ती वसूल करणे हे विधिसंमत असेल.
३) लोक जमण्याची जागा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तेव्हा उक्त प्रयोजनासाठी ज्या रकमा लागतील त्या नगरपालिकेकडून किंवा महानगरपालिकेकडून वसूल करता येतील.

Leave a Reply