गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३४ :
संसदेपुढे मांडावयाचे नियम व विनियम :
या अधिनियमाअन्वये केलेला प्रत्येक नियम आणि प्रत्येक विनियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, ते एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण तीस दिवसांच्या कालावधीकरिता सत्रासीन असताना ठेवला जाईल आणि पूर्वोक्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमांत वा विनियमात कोणतेही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले अथवा तो नियम विनियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले, तर त्यानंतर ते नियम किंवा विनियम अशा फेरबदल केलेल्या स्वरुपातच परिणामक होतील किंवा, यथास्थिति, मुळीच परिणामक होणार नाहीत; तथापि, असे कोणतेही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमान्वये किंवा विनियमान्वये पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टींच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.
