भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०२ :
लोकसेवकाने बेकायदेशीरपणे व्यापारधंदा करणे :
कलम : २०२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने बेकायदेशीर व्यापारधंदा करणे.
शिक्षा : १ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी लोकसेवक असून आणि असा लोकसेवक म्हणून विधित: (कायद्याने) व्यापारधंदा करण्यास मनाई असताना तो तसा व्यापराधंदा करील त्यास, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा किंवा सामुदायिक सेवेची शिक्षा होतील.