Bns 2023 कलम ११६ : जबर दुखापत :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११६ :
जबर दुखापत :
पुढील प्रकारच्या दुखापती याच फक्त जबर म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत :-
(a) क)(अ) पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग)
(b) ख) (ब) कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
(c) ग) (क) कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
(d) घ) (ड) कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे.
(e) ङ) (इ) कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे.
(f) च) (फ) मस्तक (डोके) किंवा चेहरा कायमचा विद्रूप करणे.
(g) छ) (ग) हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे.
(h) ज) (ह) ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा पीडित व्यक्तीला पंधरा दिवस इतका काळ दु:सह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत.

Leave a Reply