लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ३४ :
बालकाने केलेल्या अपराधाच्या बाबतीतील कार्यपद्धती आणि विशेष न्यायालयाने वयाबाबत निर्णय देणे :
१) या अधिनियमाखालील कोणताही अपराध बालकाने केला असेल त्याबाबतीत अशा बालकाला १.(बालन्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६ चा ०२)) याच्या तरतुदींनुसार वागवण्यात येईल.
२) विशेष न्यायालयासमोरील कोणत्याही कार्यवाहीमध्य, एखादी व्यक्ती बालक आहे किंवा नाही असा कोणताही प्रश्न उद्भवला असेल तर, अशा व्यक्तीच्या वयाविषयी स्वत: खातरजमा केल्यानंतर, विशेष न्यायालयाकडून अशा प्रश्नावर निर्णय घेण्यात येईल आणि न्यायालय अशा निर्णयाची कारणे लेखी नमूद करील.
३) विशेष न्यायालयाने पोटकलम २) अन्वये निर्णय दिलेले एखाद्या व्यक्तीचे वय हे त्या व्यक्तीचे अचूक वय नव्हते याबाबत नंतर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यामुळे न्यायालयाने दिलेला त्याबाबतचा कोणताही आदेश हा अवैध असल्याचे मानण्यात येणार नाही.
———
१. सन २०१९ चा २५ कलम ९ अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० याशब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले (१८-०८-२०१९ रोजी व तेव्हा पासून).