बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ११२ :
अडचणी दूर करण्याचे अधिकार :
१) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या अंमलबजावणीस कोणतीही अडचण आल्यास, केन्द्र सरकार या अधिनियमातील तरतुदीस बाधा येणार नाही अशा पद्धतीने सदर अडचण दूर करण्याचे आदेश देईल:
परंतु असे की, हा अधिनियम अंमलात आल्यापासून दोन वर्षाच्या कालावधीनंतर असा कोणताही आदेश दिला जाणार नाही.
२) तथापि या कलमा अन्वये देण्यात आलेला कोणताही आदेश, आदेश दिल्यावर लवकरात लवकर संसदेच्या दोन्ही सदनांसमोर सादर केला जाईल.