बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ११० :
नियम तयार करण्याचे हक्क :
१) राज्य सरकार, अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करुन या अधिनियमातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते नियम करु शकतील :
परंतु असे की, केंद्र सरकार या संदर्भात तसेच राज्य सरकार यांनीही ज्या संदर्भात नियम करणे आवश्यक आहे त्याबाबत आदर्श नियमावली करेल आणि केन्द्र सरकारनी तयार केलेल्या सर्व नियमातील तरतुदींबाबत आवश्यक ते बदल करुन राज्य शासवर बंधनकारक असतील.
२) विशेषत: आणि सर्वसाधारण हक्कांना बाधा न आणता, हे नियममध्ये खालील सर्व किंवा काही बाबींकरीता तरतुद करता येतील, अर्थात् :-
एक) हरवलेल्या किंवा घरातून पळालेल्या ज्या बालकाचे माता पिता सापडत नाहीत, त्याचे संदर्भात कलम २ च्या पोटकलम (१४) मधील खंड (सात) अन्वये केलेली चौकशीची पद्धती;
दोन) बाल गृहात नेमण्यात आलेल्या बाल कल्याण अधिकाऱ्याच्या, कलम २, पोटकलम (१८) अन्वये सोपविलेल्या जबाबदाऱ्या;
तीन) मंडळाच्या सभासदांची कलम ४ च्या पोट-कलम (२) अन्वये पात्रता;
चार) कलम ४ च्या पोटकलम (५) अन्वये मंडळाच्या सर्व सदस्यांचे समावेश प्रारंभिक प्रशिक्षण आणि संवेदनशाीलता;
पाच) कलम ४ च्या पोटकलम (६) अन्वये मंडळाच्या सभासदांचा कार्यकाल आणि राजीनामा देण्याची क्रियारीती;
सहा) कलम ७ च्या पोटकलम (१) अन्वये मंडळाच्या सभांचा कालावधी आणि सभांच्या दरम्यान करावयाच्या कामांची प्रक्रियेचे नियम;
सात) कलम ८ च्या पोटकलम (३) च्या खंड (घ) अन्वये दुभाषा किंवा भाषांतरकारांची पात्रता, अनुभव आणि त्यांना देय मेहनताना;
आठ) कलम ८ च्या पोटकलम (३) च्या खंड (ढ) प्रमाणे मंडळाची इतर काही कर्तव्ये;
नऊ) कलम १० च्या पोट-कलम (२) अन्वये कायद्याचे उल्लघंन केले गेल्याचा संशय असलेल्या बालकास ज्या व्यक्ती मार्फत कोणत्या पद्धतीने हजर करुन घेता येईल व कोणत्या पद्धतीने बालकास निरीक्षण गृहात किंवा सुरक्षित ठिकाणी पाठवता येईल याची कार्यपद्धती;
दहा) कलम १२ च्या पोटकलम (२) अन्वये पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या व जामिनावर मुक्त न केलेल्या व्यक्तीला मंडळासमोर हजर करण्यापर्यंत निरीक्षणगृहात ठेवण्याबाबत पद्धती;
अकरा) कलम १६ च्या पोटकलम (३) अन्वये मंडळापुढे असलेल्या प्रलंबित प्रकरणांबाबत मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांना किंवा मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांना आणि जिल्हा न्यायाधिशांना सादर करावयाच्या अहवालाचा मसुदा;
बारा) कलम २० च्या पोट-कलम (२) अन्वये नियंत्रणाची पद्धत आणि नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी;
तेरा) कलम २४ च्या पोटकलम (२) अन्वये बालकासंबंधीचा अभिलेख मंडळाने, पोलिसांनी आणि न्यायालयाने नष्ट करण्याची कार्यपद्धती ;
चौदा) कलम २७ च्या पोटकलम (५) अन्वये बाल कल्याण समितीवरील सभासदांची पात्रता;
१.(चौदा-क) कलम २७ च्या पोटकलम (८) अन्वये जिल्हा दंडाधिकाऱ्याला अहवाल सादर करण्याचा प्ररुप (नमुना);)
पंधरा) कलम २८ च्या पोटकलम (१) अन्वये बाल कल्याण समितीच्या सभांमध्ये कामकाजाची कार्यपद्धती व नियम;
सोळा) कलम ३० च्या खंड (भ) अन्वये हरवलेल्या किंवा सोडून दिलेल्या बालकांना पुन्हा त्यांच्या कुटूंबाशी मिळवण्याची कार्यपद्धती,
सतरा) कलम ३१ च्या पोटकलम (२) अन्वये समितीला अहवाल सादर करण्याची आणि बालकाला बाल गृहात किंवा योग्य जागी किंवा योग्य व्यक्तीकडे पाठविण्याची आणि सोपविण्याची कार्यपद्धती;
अठरा) कलम ३६ च्या पोटकलम (१) अन्वये बालकल्याण समितीची चौकशी करण्याची कार्यपद्धती;
एकोणीस) कलम ३६ चे पोटकलम (३) अन्वये जर बालक सहा वर्षापेक्षा कमी वयाचे असल्यास, त्याच्या पुनर्वसनाची योग्य सोय होईपर्यंत, बालकास विशेष दत्तकविधान संस्थेकडे, बालगृहात, सुयोग्य संस्थेत किंवा सुयोग्य व्यक्तीकडे सोपविण्याची आणि बालगृहात किंवा सुयोग्य संस्थेत किंवा सुयोग्य व्यक्तीकडे किंवा उसन्या संगोपनात ठेवलेल्या बालकाच्या परिस्थितीवर देखदेख ठेवण्याची कार्यपद्धती;
वीस) कलम ३६ च्या पोटकलम (४) अन्वये प्रलंबीत प्रकरणांच्या पुनर्विलोकनाबाबत समितीकडून जिल्हा न्यायाधिशांना पाठवावयाच्या तिमाही अहवालाची कार्यपद्धती;
एकवीस) कलम ३७ च्या पोटकलम (२) च्या खंड (तीन) अन्वये समितीच्या इतर कोणत्याही कामकाजाबाबत इतर कोणतेही आदेश;
बावीस) कलम ३८ च्या पोट-कलम (५) अन्वये समितीकडून राज्य सरकारच्या संस्थेस आणि अधिकाऱ्यांना मासिक तत्त्वावर, दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहणासाठी) मुक्त म्हणून जाहीर झालेल्या मुलांची संख्या आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या याबाबत माहिती देणे;
१.(बावीस-क) कलम ४० च्या पोटकलम (४) अन्वये प्रत्यावर्तन, मृत्यु आणि पळुण जाण्यासंबंधी तिमाही अहवालाचा नमुना;)
तेवीस) कलम ४१ च्या पोटकलम (१) अन्वये या अधिनियमाखालील सर्व संस्थांची नोंदणी कशा पद्धतीने झाली पाहिजे याबाबत पद्धती;
चोवीस) कलम ४१ च्या पोटकलम (७) अन्वये बालकांना पूनर्वसन आणि सामाजिक सम्मेलीकरण सेवा न देणाऱ्या संस्थांनी नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित ठेवण्याची कार्यपद्धती;
पंचवीस) कलम ४३ च्या पोटकलम (३) अन्वये मुक्त आश्रयस्थानाकडून दरमहा जिल्हा बाल संरक्षण केंद्रास आणि समितीस माहिती पुरविण्याबाबत नियम;
सव्वीस) कलम ४४ च्या पोटकलम (१) अन्वये बालकास उसन्या संगोपनात आणि सामुहिक उसन्या संगोपनात ठेवण्याची कार्यपद्धती;
सत्तावीस) कलम ४४ च्या पोटकलम (४) अन्वये उसन्या संगोपनात ठेवलेल्या बालकांची तपासणीची प्रक्रिया;
अठ्ठावीस) कलम ४४ च्या पोटकलम (६) अन्वये उसने संगोपन देणाऱ्या कुटुंबाने बालकाला शिक्षण, आरोग्यसेवा आणि आहार पुरविण्याची पद्धत;
एकोणतीस) कलम ४४ च्या पोटकलम (७) अन्वये बालकांना उसने संगोपन पुरविण्याची पद्धत आणि निकष;
तीस) कलम ४४ च्या पोटकलम (८) अन्वये बालकाच्या कल्याणाची खात्री करण्यासाठी उसन्या कुटूंबाची तपासणी करण्याचा मसुदा;
एकतीस) कलम ४५ च्या पोटकलम (१) अन्वये बालकांसाठी प्रायोजकत्वाच्या विविध कल्पना उदा., व्यक्तिगत प्रायोजकत्व, सामुहिक प्रायोजकत्व किंवा परिसर प्रायोजकत्व राबविण्याचे उद्देश;
बत्तीस) कलम ४५ च्या पोटकलम (३) अन्वये प्रायोजकत्वाची कालमर्यादा;
तेहतीस) कलम ४६ अन्वये वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याने संस्थेचा आधार सोडून जाणाऱ्या बालकास आर्थिक आधार पुरविण्याची पद्धत;
चांैतीस) कलम ४७ च्या पोटकलम (३) अन्वये विविध निरीक्षण गृहे व त्यांच्याकडून कायद्याविरुद्ध गेल्याचा आरोप असलेल्या बालकाच्या पुनर्वसनासाठी आणि सामाजिक सम्मिलीकरणासाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवा यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण आणि निरीक्षण गृहांच्या नोंदणीस मंजुरी देण्याची किंवा काढून घेण्याची पद्धत;
पस्तीस) कलम ४८ च्या पोटकलम (२) आणि (३) अन्वये विशेष गृहांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण आणि त्यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा;
छत्तीस) कलम ५० च्या पोटकलम (३) अन्वये बालगृहे व त्यांच्याकडून बालकांच्या व्यक्तिगत संगोपन योजनेअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचे स्वरुप आणि दर्जा यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण;
सदोतीस) कलम ५१ च्या पोटकलम (१) अन्वये त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमान्वये नोंदणी झालेल्या आणि संस्थेच्या योग्यतेबाबत आवश्यक चौकशीअंती, बालकाची तात्पुरती जबाबदारी स्वीकारणाऱ्या शासकीय संस्थेकडून किंवा खाजगी स्वयंसेवी अशासकीय संस्थेस मंडळ किंवा समितीकडून मान्यता देण्याची पद्धत;
अडोतीस) मंडळ किंवा समिती द्वारा कलम ५२ च्या पोटकलम (१) अन्वये तात्पुरत्या स्वरुपात संगोपन, संरक्षण आणि उपचार यासाठी बालकाचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीच्या पात्रतेची पडताळणी आणि मान्यता देण्याची पद्धत;
एकोणचाळीस) कलम ५३ च्या पोटकलम (१) अन्वये, या अधिनियमान्वये बालकास संस्थेमार्फत पुनर्वसन आणि सामाजिक सम्मिलीकरणाची सेवा व अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय उपचार यासारख्या मूलभूत गरजा पुरविण्याची पद्धत आणि सदर संस्थेचे पात्रता निकष;
चाळीस) कलम ५३ च्या पोटकलम (२) अन्वये प्रत्येक संस्थेकडून, बालकाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्थापन समितीची नेमणूक करण्याची पद्धत;
एक्केचाळीस) कलम ५३ च्या पोटकलम (३) अन्वये बालक समिती प्रारंभ करु शकेल अशा सेवा;
बेचाळीस) कलम ५४ च्या पोटकलम (१) अन्वये राज्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी सर्व नोंदणी झालेल्या किंवा सुयोग्य संस्था
म्हणून मान्यता दिलेल्या संस्थांवर देखरेख करण्यासाठी देखरेख समिती नेमणे;
त्रेचाळीस) कलम ५५ च्या पोटकलम (१) अन्वये केन्द्र सरकार किंवा राज्य सरकारकडून स्वतंत्रपणे, व्यक्ती किंवा मंडळे, समित्या, या संस्थांमार्फत, विशेष बाल पोलीस केंद्रे, नोंदणीकृत संस्था किंवा सुयोग्य संस्था किंवा व्यक्ती म्हणून मान्यता मिळालेल्या संस्था किंवा व्यक्ती यांचे मूल्यमापनाची पद्धत आणि त्यांचा कालावधी ठरविणे;
चव्वेचाळीस) कलम ६६ च्या पोटकलम (२) अन्वये कायदेशिरपणे दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहण) योग्य ठरविण्यात आलेल्या बालकांचा तपशील विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेत पुरविण्याची पद्धत;
पंच्चेचाळीस) कलम ६८ च्या खंड (ङ) अन्वये प्राधिकरणाची इतर कोणतीही कर्तव्य;
शेहचाळीस) कलम ६९ च्या पोटकलम (२) अन्वये प्राधिकरणाच्या सुकाणू (निर्वाचन) समितीच्या सदस्यांची निवड किंवा नामांकन करण्याचे निकष, त्यांचा कार्यकाल किंवा नेमणुकीच्या अटी व शर्ती;
सत्तेचाळीस) कलम ६९ च्या पोटकलम (४) अन्वये प्राधिकरणाच्या सुकाणू (निर्वाचन) समितीच्या सभांची पद्धत;
अठ्ठेचाळीस) कलम ७१ च्या पोटकलम (१) अन्वये प्राधिकरणाकडून केन्द्र सरकार यास वार्षिक अहवाल सादर करण्याची पद्धत;
एकोणपन्नास) कलम ७२ च्या पोटकलम (२) अन्वये प्राधिकरणाची कर्तव्ये;
पन्नास) कलम ७३ च्या पोटकलम (१) अन्वये प्राधिकरणामार्फत योग्य जमाखर्च आणि संबंधित अभिलेख ठेवण्याची आणि जमाखर्चाचा वार्षिक अहवाल तयार करण्याची पद्धत;
एक्कावन्न) कलम ९२ अन्वये आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झालेल्या व प्रदीर्घ शारीरिक किंवा मानसिक वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या बालकाच्या उपचारासाठी सुयोग्य संस्थेस, समिती किंवा मंडळाकडून कालावधी ठरवून देणे;
बावन्न) कलम ९५ च्या पोटकलम (१) अन्वये बालकाच्या स्थानांतराची पद्धत;
त्रेपन्न) कलम ९५ च्या पोटकलम (३) अन्वये बालकास प्रवासात संरक्षण पुरविणाऱ्या पथकाम प्रवासभत्त्याची तजवीज;
चोपन्न) कलम १०३ च्या पोटकलम (१) अन्वये कोणतीही चौकशी, अपील किंवा पुनर्विलोकन करण्याची समिती किंवा मंडळाकडून अवलंबली जाणारी कार्यपद्धती;
पंचावन्न) कलम १०५ च्या पोटकलम (३) अन्वये बाल न्याय निधीचा वापर करण्याची पद्धत;
छपन्न) कलम १०६ अन्वये राज्याची बाल संरक्षण संस्था किंवा प्रत्येक जिल्ह्याचे बाल संरक्षण केंद्र यांची कार्यपद्धती;
सत्तावन्न) कलम १०९ च्या पोटकलम (१) अन्वये राष्ट्रीय आयोग किंवा परिस्थितीनुरुप राज्य आयोग यांच्यामार्फत, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याचे अधिकार;
अठ्ठावन्न) विहित करणे अपेक्षित आहे किंवा विहित केले जाईल अशी आवश्यक असलेली इतर कोणतीही बाब;
३) या अधिनियमान्वये तयार करण्यात आलेला प्रत्येक नियम आणि अट, तयार करण्यात आल्यावर लवकरात लवकर अधिवेशन सुरु असतांना संसदेच्या प्रत्येक सदनाच्या पटलावर तीस दिवसांसाठी एका अधिवेशनात किंवा दोन किंवा अधिक सलग अधिवेशनात सादर केले जाईल आणि जर दोन्ही सदनातून त्या नियम किंवा अटीमधील फेरबदलाला मंजुरी मिळाल्यास किंवा सदर फेरबदल न करण्याबाबत ठराव संमत झाल्यास, सदर नियम किंवा अट यातील फेरबदल, ठरावात मंजूर झालेल्या स्वरुपात कार्यान्वित होईल. मात्र असा कोणताही फेरबदल किंवा कपात ही यापूर्वी सदर नियम किंवा अटीनुसार केलेल्या कारवाईवर परिणाम करणार नाही.
४) या अधिनियमान्वये राज्य सरकारकडून करण्यात येणारा कोणताही नियम, यथाशीघ्र, राज्याच्या विधिमंडळासमोर सादर करण्यात येईल;
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २९ द्वारा समाविष्ट केले.