बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०० :
सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :
केन्द्र सरकार, राज्य सरकार किंवा केन्द्र किंवा राज्य सरकारच्या आदेशाने कर्तव्य करणारी व्यक्ती यांनी सद्भावपूर्वक केलेल्या आणि या अधिनियमाच्या किंवा या अधिनियमाखाली तयार करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाच्या अनुषंगाने कारवाईसाठी कोणताही दावा किंवा खटला किंवा न्यायिक कारवाई दाखल करता येणार नाही.