JJ act 2015 कलम ८७ : अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८७ :
अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) :
जी कोणी व्यक्ती या अधिनियमाखालील अपराधांना अपप्रेरण देईल, जर अपप्रेरणाचे परिणामस्वरुप तो अपराध घडल्यास त्या व्यक्तीला अपराधास जेवढी शिक्षेची तरतूद केली आहे तेवढीच शिक्षा दिली जाईल.
१.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, अपप्रेरण चा अर्थ तोच असेल जो भारतीय दंड संहिता १९८६० (१८६० चा ४५) याच्या कलम १०७ मध्ये दिलेला आहे.)
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २७ द्वारा स्पष्टीकरणाऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply