बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७७ :
बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा मनोव्यापरावर परिणाम करणारा पदार्थ देणाऱ्यास शिक्षा :
जो कोणी एखाद्या बालकास गुंगीकारक मद्य किंवा अंमली पदार्थ किंवा तंबाखूजन्य पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ, मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याशिवाय देईल किंवा देववील, त्या व्यक्तीस सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेले इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.