बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७२ :
केन्द्र सरकारकडून अनुदान :
१) या संबंधातील कायद्यानुसार संसदेने आवश्यक निधी मंजूर केल्यानुसार, केन्द्र सरकार प्राधिकरणाला अनुदानाच्या स्वरुपात या अधिनियमानुसार कामकाजासाठी आवश्यक तो निधी मंजूर करील.
२) प्राधिकरण त्यांच्या या अधिनियमानुसार कामकाजासाठी आवश्यक तो खर्च सदर पोटकलम (१) मध्ये नमूद केलेल्या निधीमधून करील.