बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६४ :
दत्तकविधानाबाबत (दत्तक ग्रहणाबाबत) माहिती देणे :
त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमात काहीही नमूद असले तरी, १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून) देण्यात येणाऱ्या दत्तकविधानाच्या आदेशाबाबत, दत्तकविधान नियंत्रण प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या पद्धतीने दत्तकविधान प्राधिकरणास, दत्तक आदेशांबाबत माहिती संकलित करण्यासाठी मासिक अहवालापर्यंत पाठविली पाहिजे.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २३ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले