JJ act 2015 कलम ६२ : अतिरिक्त कारवाईची आवश्यकता आणि अभिलेखनिर्मिती :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६२ :
अतिरिक्त कारवाईची आवश्यकता आणि अभिलेखनिर्मिती :
१) अनाथ, सोडून दिलेले किंवा जमा केलेले बालक यांना दत्तक घेणारे भारतीय मातापिता, किंवा अनिवासी भारतीय किंवा परदेशस्थ भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे किंवा परदेशी नागरिकांच्या दत्तकविधानाच्या (दत्तक ग्रहणाच्या) कारवाईत, या अधिनियमात उल्लेख केलेला नसलेल्या अभिलेखनिर्मिती आणि कारवाईच्या गरजा दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार असतील.
२) विशेष दत्तक संस्था, दत्तक घेणाऱ्या पालकांच्या दत्तक प्रकरणाची निर्गती अर्ज प्राप्त झाल्यापासून चार महिन्यांत पूर्ण करतील आणि अधिकृत परदेशी दत्तक संस्था, प्राधिकरण आणि राज्य संस्था दत्तक प्रकरणाच्या प्रगतीचा पाठपुरावा करतील आणि समयबद्ध निर्गंतीसाठी आवश्यकता भासल्यास हस्तक्षेप करतील.

Leave a Reply