JJ act 2015 कलम ६० : नात्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहण) क्रियारीती :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६० :
नात्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहण) क्रियारीती :
१) परदेशात वास्तव्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीस भारतात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकाचे मूल दत्तक घ्यावयाचे असल्यास, त्याने १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे) त्याबाबत अर्ज सादर करुन न्यायालयाचा आदेश घ्यावा आणि दत्तक नियंत्रण प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.
२) दत्तक नियंत्रण संस्थेचे अधिकारी, पोट-कलम (१) अन्वये देण्यात आलेला आदेश आणि बालकाचे जन्मदाते माता-पिता किंवा दत्तक घेणारे माता-पिता यांच्याकडून अर्ज प्राप्त झाल्यावर भारतीय आणि बालक जाणार असलेल्या देशाच्या अप्रवास (देशांतरण) अधिकाऱ्यांना सूचना देऊन ना-हरकत प्रमाणपत्र देतील.
३) दत्तक घेणारे माता-पिता, पोटकलम (२) अन्वये ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, जन्मदात्यांकडून बालकास ताब्यात घेतील आणि वेळोवेळी दत्तक घेतलेल्या बालकास जन्मदात्या माता-पित्यांना भेटण्यास देतील.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २० द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply