JJ act 2015 कलम ५७ : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांची पात्रता :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५७ :
दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांची पात्रता :
१) बालकास दत्तक घेऊ इच्छिणारे माता-पिता शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम आणि बालकाचा चांगला विकार करण्याची प्रबळ इच्छा असलेले असावेत.
२) दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यास जोडप्यास, दत्तक घेण्याची दोघांचीही मान्यता असणे आवश्यक असेल.
३) एकटी किंवा घटस्फोटित व्यक्ती ही, दत्तकासाठी आवश्यक निकषांवर आणि दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमाच्या आधारे योग्य असल्यास बालकास दत्तक घेऊ शकेल.
४) एकट्या पुरुष व्यक्तीस मुलगी दत्तक घेता येणार नाही.
५) दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमाच्या आधारे योग्य.

Leave a Reply