बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १३ :
माता-पिता, पालक किंवा परिवीक्षा अधिकारी यांना माहिती देणे :
१) जेव्हा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बालकास ताब्यात घेतले तेव्हा पोलीस ठाण्याच्या बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून नामनिर्देशित अधिकारी किंवा त्या बालकास जेथे आणले असेल असे विशेष बाल न्याय पोलीस केन्द्र यांनी बालकास ताब्यात घेतल्यानंतर यथाशीघ्र (त्वरीत),
एक) बालकाचे माता-पिता किंवा पालक, यांचा पत्ता लागल्यास त्याला अशा अटकेबद्दल माहिती देईल आणि ते बालक जेथे हजर होणार असेल त्या मंडळात हजर राहण्याचा निदेश (सूचना) देईल; आणि
दोन) परिवीक्षा अधिकारी किंवा परिवीक्षा अधिकारी उपलब्ध नसल्यास, बाल कल्याण अधिकाऱ्यास, दोन आठवड्यांच्य आत, सदर बालकाचा पूर्वइतिहास आणि त्याची कौटूंबिक पाश्र्वभूमी तसेच मंडळास सदर बालकाबाबत चौकशी करण्यास सहाय्यभूत ठरेल, अशी कोणतीही महत्वाची माहिती अंतर्भूत असलेला सामाजिक अन्वेषण अहवाल पूर्ण करुन मंडळापुढे सादर करण्याबाबत सूचना द्याव्यात.
२) जर अशा बालकास जामिनावर मुक्त केले असल्यास परिवीक्षा अधिकारी किंवा बाल कल्याण अधिकाऱ्यास त्याबाबत माहिती द्यावी.