Constitution अनुच्छेद ३६५ : संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३६५ :
संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम :
या संविधानात असलेल्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींन्वये संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर करताना दिलेल्या कोणत्याही निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कोणत्याही राज्याने कसूर केली असेल त्या बाबतीत, त्या राज्याचे शासन संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे, असे राष्ट्रपतीने ठरवणे कायदेशीर होईल.

Leave a Reply