भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छदे ३३३ :
राज्यांच्या विधानसभांमध्ये आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व :
अनुच्छेद १७० मध्ये काहीही असले तरी, जर एखाद्या राज्याच्या विधानसभेत, आंग्लभारतीय समाजास प्रतिनिधित्व मिळण्याची गरज आहे व त्यास पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही, असे त्या राज्याच्या राज्यपालाचे १.(***) मत असेल तर, त्याला २.(त्या समाजाचा एक सदस्य विधानसभेवर नामनिर्देशित करता येईल.)
————
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुखाचे हा मजकूर गाळला.
२. संविधान (तेविसावी सुधारणा) अधिनियम, १९६९ याच्या कलम ४ द्वारे त्या विधानसभेत त्यास समुचित वाटतील तितके त्या समाजाचे सदस्य नामनिर्देशित करता येतील या मजकुराऐवजी दाखल केला.