भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३२२ :
लोकसेवा आयोगांचा खर्च :
संघ किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा खर्च, आयोगाच्या सदस्यांना किंवा कर्मचारीवर्गाला अथवा त्यांच्यासंबंधात द्यावयाचे कोणतेही वेतन, भत्ते व पेन्शने धरूनभारताच्या एकत्रित निधीवर, किंवा यथास्थिति, राज्याच्या एकत्रित निधीवर भारित केला जाईल.