भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २८७ :
विजेवरील करांपासून सूट :
जी वीज,—
(क) भारत सरकारकडून वापरली जाते किंवा भारत सरकारच्या वापराकरता त्या सरकारला विकली जाते ; अथवा
(ख) कोणतीही रेल्वे बांधणे, तिची देखभाल करणे किंवा ती चालविणे या कामी भारत सरकारकडून किंवा ती रेल्वे चालविणाऱ्या रेल्वे कंपनीकडून वापरली जाते, अथवा कोणतीही रेल्वे बांधणे, तिची देखभाल करणे किंवा चालविणे या कामी वापरण्याकरता त्या सरकारला किंवा अशा कोणत्याही रेल्वे कंपनीला विकली जाते, अशा विजेच्या वापरावर किंवा विक्रीवर (मग तिचे उत्पादन सरकारने केलेले असो किंवा अन्य व्यक्तींनी केलेले असो). संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त राज्याच्या कोणत्याही कायद्याद्वारे कर बसवता येणार नाही आणि विजेच्या विक्रीवर कर बसविणाऱ्या किंवा बसवणे प्राधिकृत करणाऱ्या अशा कोणत्याही कायद्याद्वारे, भारत सरकारला त्या सरकारच्या वापराकरता किंवा पूर्वोक्त अशा कोणत्याही रेल्वे कंपनीला कोणतीही रेल्वे बांधणे, तिची देखभाल करणे किंवा ती चालविणे या कामी वापरण्याकरता विकलेल्या विजेची किंमत ही, विजेचा भरीव प्रमाणात वापर करणाऱ्या अन्य उपभोक्त्यांवर आकारल्या जाणाऱ्या किंमतीपेक्षा कराच्या रकमेइतकी कमी असेल, याची सुनिश्चिती करण्यात येईल.