भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २८६ :
मालाची विक्री किंवा खरेदी यांवर कर बसविण्यासंबंधी निर्बंध :
(१) १.(वस्तूंचा किंवा सेवांचा अथवा दोन्हींचा पुरवठा, जेव्हा असा पुरवठा )-
(क) राज्याच्या बाहेर १.(घडतो) ; किंवा
(ख) भारताच्या राज्यक्षेत्रात २.(वस्तूंची किंवा सेवांची अथवा दोन्हींची) आयात करण्याच्या किंवा त्याच्याबाहेर २.(वस्तूंची किंवा सेवांची अथववा दोन्हींची) निर्यात करण्याच्या ओघात घडते, तेव्हा त्या बाबतीत, राज्याचा कोणताही कायदा अशा विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसविणार नाही किंवा बसवणे प्राधिकृत करणार नाही.
३.(***)
४.((२) ५.(वस्तूंचा किंवा सेवांचा अथवा दोन्हींचा पुरवठा) खंड (१) मध्ये उल्लेखिलेल्या प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे केव्हा ५.(घडतो) हे ठरविण्यासाठी संसदेला, कायद्याद्वारे तत्त्वे सूत्रबद्ध करता येतील.
६.(***)
————
१. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १३ द्वारा (१६-९-२०१६ पासून) मालाची विक्रि किंवा खरेदी जेव्हा या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १३ द्वारा (१६-९-२०१६ पासून) मालाची या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. संविधान (सहावी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ४ द्वारे खंड (१) चे स्पष्टीकरण गाळले.
४. संविधान (सहावी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ४ द्वारे खंड (२) व (३) यांऐवजी दाखल केले.
५. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १३ द्वारा (१६-९-२०१६ पासून) मालाची विक्री किंवा खरेदी ही, या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम १३ द्वारा (१६-९-२०१६ पासून) खंड (३) गाळण्यात येईल.