भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २७७ :
व्यावृत्ती :
या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कोणत्याही राज्याचे शासन अथवा कोणतीही नगरपालिका किंवा अन्य स्थानिक प्राधिकरण किंवा निकाय यांच्याकडून राज्य, नगरपालिका, जिल्हा किंवा अन्य स्थानिक क्षेत्र यांच्या प्रयोजनांकरता कायदेशीरपणे आकारले जात होते, असे काणतेही कर, शुल्क, उपकर किंवा फी, जरी संघ सूचीत उल्लेखिलेली असली तरीही, ते कर शुल्क, उपकर किंवा फी यांची आकारणी व त्या प्रयोजनांकरता होणारा त्यांचा विनियोग, संसदेकडून कायद्याद्वारे त्याविरूद्ध तरतूद केली जाईपर्यंत, चालू ठेवता येईल.