Constitution अनुच्छेद २४६क : वस्तू व सेवा कराच्या संबंधात विशेष तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४६क :
१.(वस्तू व सेवा कराच्या संबंधात विशेष तरतूद :
१) अनुच्छेद २४६ व २५४ यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, संसदेस, आणि खंड (२) ला अधीन राहून, प्रत्येक राज्याच्या विधानमंडळास, संघराज्याने किंवा अशा राज्याने बसविलेल्या वस्तू व सेवा कराच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार असेल.
२) जेव्हा वस्तूंचा, किंवा सेवांचा, अथवा दोन्हींचा पुरवठा, आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य यांच्या ओघात होत असेल तेव्हा, संसदेला, वस्तू व सेवा कराच्या बाबतीत कायदे करण्याचा अनन्य अधिकार असेल.
स्पष्टीकरण :
या अनुच्छेदाच्या तरतुदी,ल अनुच्छेद २७९ क च्या खंड (५) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वस्तू व सेवा कराच्या बाबतीत, वस्तू व सेवा कर परिषदेने शिफारस केलेल्या दिनांकापासून अंमलात येतील.)
——–
१. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम २ द्वारा (१६-९-२०१६ पासून) समाविष्ट केले.

Leave a Reply