Constitution अनुच्छेद २४५ : संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग ११ :
संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंध :
प्रकरण १ :
वैधानिक संबंध :
वैधानिक अधिकारांची विभागणी :
अनुच्छेद २४५ :
संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती :
(१) या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून,संसदेला, भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता कायदे करता येतील आणि राज्याच्या विधानमंडळाला, त्या संपूर्ण राज्याकरता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता कायदे करता येतील.
(२) संसदेने केलेला कोणताही कायदा, राज्यक्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो विधिअग्राह्य असल्याचे मानले जाणार नाही.

Leave a Reply