भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यद :
बहुराज्यीय सहकारी संस्थाना लागू असणे :
राज्य विधान मंडळ, राज्य अधिनियम, किंवा राज्यशासन या संबंधिच्या कोणत्याही निर्देशाचा अन्वयार्थ, अनुक्रमे संसदेचा केंद्रीय अधिनियमाचा किंवा केंद्रसरकारचा तो निर्देश आहे, असा लावला जाईल या फे रबदलास अधीन राहून या भागाच्या तरतुदी, बहुराज्यीय सहकारी संस्थानां लागू होतील.