Constitution अनुच्छेद २४३-यक : नगरपालिकांच्या निवडणुका :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-यक :
नगरपालिकांच्या निवडणुका :
(१) नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या आणि अशा निवडणुकांचे आयोजन करण्याच्या कामाचे अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण या बाबी, अनुच्छेद २४३-ट मध्ये निर्देशिलेल्या राज्य निवडणूक आयोगाकडे निहित असतील.
(२) संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याचे विधानमंडळ, कायद्याद्वारे, नगरपालिकांच्या निवडणुकांशी संबंधित किंवा निगडित असणाऱ्या सर्व बाबींसाठी तरतूद करील.

Leave a Reply