Constitution अनुच्छेद २४३-द : नगरपालिकांची रचना :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-द :
नगरपालिकांची रचना :
(१) खंड (२) मध्ये तरतूद करण्यात आली असेल ती खेरीजकरून, नगरपालिकेतील सर्व जागा, नगरपालिका क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या व्यक्तींद्वारे भरण्यात येतील आणि या प्रयोजनासाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्राची, प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक मतदारसंघांमध्ये विभागणी करण्यात येईल.
(२) राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे
(क) (एक) नगरपालिका प्रशासनामध्ये विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना ;
(दोन) पूर्ण किंवा आंशिक नगरपालिका क्षेत्र समाविष्ट असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सदस्यांना
आणि राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांना ;
(तीन) नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेल्या राज्यसभा सदस्यांना आणि विधानपरिषद सदस्यांना ;
(चार) अनुच्छेद २४३ध च्या खंड (५) अन्वये घटित करण्यात आलेल्या समित्यांच्या अध्यक्षांना, नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी तरतूद करू शकेल :
परंतु असे की, परिच्छेद (एक) मध्ये निर्देशिलेल्या व्यक्तींना, नगरपालिकेच्या बैठकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असणार नाही ;
(ख) नगरपालिकेच्या अध्यक्षाची निवड करण्याच्या रीतीसाठी तरतूद करू शकेल.

Leave a Reply