Constitution अनुच्छेद २३६ : अर्थ लावणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २३६ :
अर्थ लावणे :
या प्रकरणातील,—-
(क) जिल्हा न्यायाधीश या शब्दप्रयोगात, नगर दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीश, अपर जिल्हा न्यायाधीश, सह जिल्हा न्यायाधीश, सहायक जिल्हा न्यायाधीश, लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, मुख्य इलाखा शहर दंडाधिकारी, अपर मुख्य इलाखा शहर दंडाधिकारी, सत्र न्यायाधीश, अपर सत्र न्यायाधीश व सहायक सत्र न्यायाधीश यांचा समावेश आहे ;
(ख) न्यायिक सेवा या शब्दप्रयोगाचा, अर्थ केवळ जिल्हा न्यायाधीशाचे पद आणि जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ अशी अन्य मुलकी न्यायिक पदे ज्या व्यक्तींमधून भरली जातील अशाच व्यक्तींची सेवा, असा आहे.

Leave a Reply