भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १३६ :
अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा :
(१) या प्रकरणात काहीही असले तरी, सर्वोच्च न्यायालय, स्वविवेकानुसार, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने कोणत्याही वादात किंवा प्रकरणात दिलेला किंवा केलेला न्यायनिर्णय, हुकूमनामा, निर्धारण, शिक्षादेश किंवा आदेश यावर अपील करण्यास विशेष अनुज्ञा देऊ शकेल.
(२) सशस्त्र सेनांसंबंधीच्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये घटित केलेल्या कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने दिलेला किंवा केलेला कोणताही न्यायनिर्णय, निर्धारण, शिक्षादेश किंवा आदेश यास खंड (१) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.