भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १०४ :
अनुच्छेद ९९ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती :
जर एखाद्या व्यक्तीने, अनुच्छेद ९९ च्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यापूर्वी अथवा संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या सदस्यत्वास आपण पात्र नाही किंवा अपात्र झालो आहोत, किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अनुसार त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे, हे माहीत असताना तसे केले तर, ज्या ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापन्न झाली असेल किंवा तिने मतदान केले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल पाचशे रुपये इतक्या शास्तीस ती पात्र होईल व अशी शास्ती संघराज्याला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केली जाईल.