भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १०३ :
१.(सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय :
(१) संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा एखादा सदस्य, अनुच्छेद १०२ च्या खंड (१) मध्ये नमूद केलेल्या अपात्रतांपैकी कोणत्याही अपात्रतेस अधीन झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास, तो प्रश्न निर्णयार्थ राष्ट्रपतीकडे निर्देशित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.
(२) अशा कोणत्याही प्रश्नावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी, राष्ट्रपती निवडणूक आयोगाचे मत घेईल आणि अशा मतानुसार कृती करील.)
——————
१. अनुच्छेद १०३ हा संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याद्वारे (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून) आणि त्यानंतर संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम १४ द्वारे सुधारण्यात येऊन वरील स्वरूपात आला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).