Constitution अनुच्छेद ९० : उपसभापतिपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९० :
उपसभापतिपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे :
राज्यसभेचा उपसभापती म्हणून पद धारण करणाऱ्या सदस्यास,
(क) त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, आपले पद रिक्त करावे लागेल ;
(ख) सभापतीस संबोधून कोणत्याही वेळी आपल्या पदाचा स्वत:च्या सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल ; आणि
(ग) राज्यसभेच्या त्या वेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या, राज्यसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरुन दूर करता येईल :
परंतु असे की, खंड (ग) च्या प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव, तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज, मांडला जाणार नाही.

Leave a Reply