भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६८ :
उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी :
(१) उपराष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घ्यावयाची असेल तेव्हा, तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात येईल.
(२) उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा त्यास पदावरून दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा रिक्त होणारे त्याचे पद भरण्याकरिता, ते पद रिक्त झाल्याच्या दिनांकानंतर शक्य तितक्या लवकर कोणत्याही परिस्थितीत त्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत, निवडणूक घेण्यात येईल;आणि रिक्त पद भरण्याकरिता निवडून आलेली व्यक्ती, अनुच्छेद ६७ च्या तरतुदींना अधीन राहून, आपले पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या पूर्ण अवधीपर्यंत, पद धारण करण्यास हक्कदार असेल.