विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ९ :
शाबितीची जबाबदारी :
कलम ८ च्या कक्षेत न येणाऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये या अधिनियमाच्या संदर्भात किंवा या अधिनियमान्वये दिलेल्या एखाद्या आदेशाच्या किंवा निदेशाच्या संदर्भात जर अमुक एखादी व्यक्ती ही विदेशी व्यक्ती आहे की नाही अथवा ती व्यक्ती विशिष्ट वर्गाची किंवा वर्णनाची विदेशी व्यक्ती आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला तर, त्या परिस्थितीत ती व्यक्ती विदेशी व्यक्ती नाही अथवा, प्रकरणपरत्वे, विशिष्ट वर्गाची किंवा वर्णनाची विदोी व्यक्ती नाही हे शाबती करण्याची जबाबदारी भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (१८७२ चा १) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अशा व्यक्तीवरच राहील.
