भारताचे संविधान ( राज्यघटना ) : उद्देशिका :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
उद्देशिका :
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक १.(सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य) घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व २.(राष्ट्राची एकता आणि एकात्मता) यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत आज दिनाकं २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अगींकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.
—————
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २ द्वारे सार्वभौम लोकशाही गणराज्य या मजकुराऐवजी दाखल केले (३ जानेवारी, १९७७ रोजी व तेव्हापासून).
२. वरील अधिनियमाच्या कलम २ द्वारे राष्ट्राची एकता या मजकुराऐवजी दाखल केले (३ जानेवारी, १९७७ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply