विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम १४ख :
१.(बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी जाणूनबुजून भारतात प्रवेश करण्यासाठी बनावट पासपोर्ट वापरतो किंवा त्या त्याकाळी लागू असलेल्या अधिनियमाच्या अधिकाराशिवाय तिथे राहतो, अशा व्यक्तीस दोन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आठ वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येइल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.)
——–
१. २००४ के अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम २ द्वारा कलम १४ ऐवजी कलम १४, १४क, १४ख, १४ग समाविष्ट केले.
