मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१५क(ग) :
१.(केन्द्र शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार :
१) केन्द्र शासन या प्रकरणाच्या उपबंधांना कार्यान्वित करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल.
२) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारतेला हानी न पोचवता, अशा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :-
(a)क)अ) कलम २११अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे दाखल करणे, लायसन देणे, मंजुरी, शेरा मारुन देणे, परवाना आणि रक्कम मिळाल्याची किंवा दिल्याची पावती देणे यासाठी इलैक्ट्रॉनिक नमुने आणि साधनांचा वापर;
(b)ख)ब) कलम ११३ च्या पोटकलम (४) मध्ये नमूद केल्याप्रमाणे मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांची किंवा वर्गातील यांच्या नेमनुकीसाठीची कमीत कमी पात्रता याबाबत अपेक्षा;
(c)ग) क) कलम २१५ब च्या पोटकलम (१) अन्वये राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्डच्या अध्यक्षाची आणि सदस्यांच्या नेमणुकीच्या अटी आणि शर्ती;
(d)घ) ड) कलम २१५ब च्या पोटकलम (२) अन्वये राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्डाचे अन्य कार्ये;
(e)ङ)ई) केन्द्रशासनाने बनविलेल्या नियमातील उपबंधाअन्वये इतर कोणत्याही विनिर्दिष्ट केलेल्या बाबीं ज्या विहित केल्या असतील किंवा विहित करायच्या असतील.)
————–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.