IT Act 2000 कलम ८३ : निदेश देण्याचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८३ : निदेश देण्याचे अधिकार : हा अधिनियम किंवा त्याखाली करण्यात आलेले कोणतेही नियम, विनियम किंवा आदेश याच्या कोणत्याही तरतुदी राज्यात अमलात आणण्यासाठी केंद्र सरकार कोणत्याही राज्य शासनाला निदेश देऊ शकेल.