Bsa कलम ४५ : मतामागील कारणे केव्हा संबद्ध :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४५ : मतामागील कारणे केव्हा संबद्ध : जेव्हा जेव्हा कोणत्याही हयात व्यक्तीचे मत संबद्ध असते तेव्हा, ज्या कारणांवर असे मत आधारलेले असेल तीदेखील संबद्ध असतात. उदाहरण : एखादा तज्ञ आपले मत बनवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयोगांचा वृत्यांत देऊ शकेल.