Bnss कलम २८७ : संक्षिप्त संपरीक्षा केलेल्या खटल्यामधील न्यायनिर्णय :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २८७ : संक्षिप्त संपरीक्षा केलेल्या खटल्यामधील न्यायनिर्णय : संक्षिप्त संपरीक्षा केलेल्या ज्या ज्या खटल्यात आरोपीने आपण अपराधी असल्याची कबुली दिली नसेल अशा प्रत्येक खटल्यात, दंडाधिकारी साक्षीपुराव्याचा सारांश व निष्कर्षामागील कारणांचे त्रोटक निवेदन यांचा अंतर्भाव करून न्यायनिर्णय नमूद करील.