Ndps act कलम ६८-जे : सिद्ध करण्याची जबाबदारी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-जे : सिद्ध करण्याची जबाबदारी : या प्रकरणाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये कलम ६८-ह अन्वये काढलेल्या नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट केलेली कोणतीही मालमत्ता बेकायदेशीरपणे संपादित केलेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी बाधित व्यक्तीची असेल.
