Pca act 1960 कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोकसेवक असणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३९ : कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेल्या व्यक्ती लोकसेवक असणे : राज्य शासनाने कलम २४ अन्वये प्राधिकृत केलेली प्रत्येक व्यक्ती ही, भारतीय दंड संहिता १८६० (१८६० चा ४५) हिच्या कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.