Constitution अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती : (१) संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग लावावयाचा असेल तेव्हा, त्यासंबंधीचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येईल. (२) (क) असा दोषारोप करण्याचा प्रस्ताव एखाद्या ठरावात अंतर्भूत करून, तो ठराव मांडण्याचा आपला उद्देश असल्याबद्दल त्या सभागृहातील…