Constitution अनुच्छेद २२४ : अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशांची नियुक्ती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२४ : १.(अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशांची नियुक्ती : (१) उच्च न्यायालयाच्या कामकाजात तात्पुरती वाढ झाल्याच्या कारणामुळे अथवा काम थकीत राहिल्याच्या कारणामुळे त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या त्या वेळेपुरती वाढवावी असे राष्ट्रपतीला वाटल्यास २.(राष्ट्रपती, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी विचारविनिमय करुन,)यथोचित पात्रता…