Bnss कलम ७६ : पोलिस अधिकाऱ्याला निर्देशून लिहलेले वॉरंट :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७६ : पोलिस अधिकाऱ्याला निर्देशून लिहलेले वॉरंट : कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला निदेशून लिहिलेले वॉरंट ज्याला निदेशून लिहिलेले किंवा ज्याच्याप्रत पृष्ठांकित केलेले आहे तो अधिकारी वॉरंटावर ज्याचे नाव पृष्ठांकित करील अशा अन्य पोलीस अधिकाऱ्यालाही त्याची अमंलबजावणी करता येईल.