Bnss कलम ४५ : अपराध्याचा अन्य क्षेत्रात पाठलाग :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५ : अपराध्याचा अन्य क्षेत्रात पाठलाग : पोलीस अधिकारी जिला अटक करण्यास प्राधिकृत असेल त्या व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करण्याच्या प्रयोजनार्थ, तो अशा व्यक्तीचा भारतातील कोणत्याही स्थळी पाठलाग करू शकेल.